प्रणिती ‘ताईं’च्या चारित्र्यहनन भीतीला राम सातपुते यांचे ‘भाऊ’निक उत्तर ; म्हणाले त्या तर……..
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केला. या निवडणुकीसाठी तीस दिवस शिल्लक आहेत त्यामुळे भविष्यात भाजप माझे चारित्र्यहनन करण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली.
यावर भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी त्याच पद्धतीने उत्तर दिले. प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, राम सातपुते हा त्यांचा भाऊ आहे. त्यामुळे आमचे संस्कार असे नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा मी कार्यकर्ता आहे, त्यांनी विकासाचे बोलावे या शब्दात प्रत्युत्तर दिले.