सोलापूर ; सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे २ ऑक्टोबर रोजी धनगर समाजाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील लाखो समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो समाज बांधव जाणार असल्याची माहिती माऊली हळवणकर यांनी दिली आहे.
या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे नियोजनाची बैठक घेण्यात आली. यावेळी माऊली हळणवर, अमोल कारंडे, रामचंद्र वाकसे, सोमेश्वर क्षिरसागर, नागेश वाघमोडे, बिरूदेव शिंगाडे, शरणु हांडे, धनराज जानकर, समर्थ माशाळकर, अभिषेक भाईकट्टी, संस्कार नरोटे उपस्थित होते.
या मेळाव्यात समाजाचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. धनगर समाजातील लोकांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसह धनगर समाजातील लोकांवर होणारा अन्याय तसेच मेंढपाळावर होणारे प्राणघातक हल्ले समाजाच्या विविध प्रकारच्या अडचणी यावर विचार विनिमय होणार आहे. तरी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व पक्षीय समाजबांधवांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन अमोल कारंडे, ओबीसी सेलचे राम वाकसे यांनी केले आहे. यावेळी सचिन हाके, शरणू हांडे, धनाजी खरात, दादा बुरुंगळे, भिमा बंडगर, अमित नरुटे, आदित्य खांडेकर आदी उपस्थित होते.



















