सोलापूर : ‘हर घर झेंडा’ अभियान अंतर्गत जिल्ह्याला साडेसात लाख राष्ट्रध्वज लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. जिल्ह्यात झेंड्याची उपलब्धता होण्यासाठी व्हेंडरवरच विसंबून न राहता जिल्ह्यातील बचत गटांना राष्ट्रध्वज निर्मितीचे काम देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे,
त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उमेद अभियान अंतर्गत बचत गटांसाठी काम करणाऱ्या प्रभाग संघाचा अध्यक्ष, सचिव यांची बैठक जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली.
या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उमेद अभियान व्यवस्थापक सचिन चौरे, जिल्हा व्यवस्थापक भगवान कोरे, जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना हर घर तिरंगा या अभियानामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहणार आहे. जिल्ह्यात बचत गटांना तिरंगा झेंडा बनवण्याची संधी दिली आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडा, झेंडा तयार करणे, त्यासाठी ग्राहक शोधणे, त्याची विक्री करणे याबाबत स्वामी यांनी मार्गदर्शन केले.


















