सोलापूर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजलीपर दि ऑफिसर्स क्लब सोलापूरच्यावतीने शिवरंजनी प्रस्तुत अमर लता मेरी आवाज ही पेहेचान है या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन महापालिका प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेचे उपायुक्त तथा ऑफिसर क्लबचे सचिव धनराज पांडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या मधुर आवाजात रोमॅण्टिक नजराना प्रस्तुत केला. “तू इस तरहा से मेरी जिंदगी में शामिल है” या गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अण्णांनी हे सुंदर गीत गायल्यामुळे धनराज पांडे यांच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचे चित्र होते….पहा व्हिडीओ

















