सोलापूर : शहरातील सुपर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून एका युवकाला दुसऱ्या काही युवकांनी बेदम मारहाण करून त्याच्या गाडीची तोडफोड तसेच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सुपर पेट्रोल पंपावर रात्री सव्वा नऊच्या सुमारास पेट्रोल भरण्याचे काम चालू होते, एका ठिकाणी दोन युवक गाडी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आले त्यांनी बळजबरीने रांगेत न थांबता पेट्रोल भरण्यासाठी कर्मचाऱ्याला दम भरला तेव्हा रांगेत थांबलेल्या एका युवकाने त्यांना हटकले, याचा राग मनात धरून त्या युवकाला पाच ते सहा युवकांनी बेदम मारहाण केली. त्याच्या गाडीची मोडतोड केली तसेच मध्यस्थी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मॅनेजर राहुल व्हनसुरे यांनी माध्यमांना दिली काय घडले सुपर पेट्रोल पंपावर पहा व्हिडिओ….

















