सोलापूर विद्यापीठ अधिसभा पदवीधर सिनेट निवडणुकीमधील उमेदवार गणेश डोंगरे यांचा विजय झाला. तब्बल 724 मते घेऊन डोंगरे हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले. त्याबद्दल सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी भटक्या विमुक्त शहर अध्यक्ष भारत जाधव, प्रवक्ते हसीब नदाफ, हाजीमलंग नदाफ, मा. परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, श्रीकांत वाडेकर, शुभम माने, दशरथ गायकवाड याच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



















