सोलापूर – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या आदेशान्वये सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणिसपदी श्रीशैल रणधीरे यांची निवड केली.
या निवडीचे पत्र जनवात्सल्य निवास येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा वरीष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक एन. के. क्षिरसागर, माजी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते.
श्रीशैल रणधीरे यांची सरचिटणिसपद निवड झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.




















