सोलापूर : शहर तसेच जिल्ह्यातून तरुणी, विवाहित महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही सोलापुरातून तब्बल चार जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. एक 20 तर दुसरी 22 वर्षाची आहे. दोन्ही तरुणींचे सानिया हेच नाव आहे. एक सोलापूर विद्यापीठ तर दुसरी शहरातील कुमठा नाका परिसरातून बेपत्ता झाली आहे.
सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कुमठा नाका परिसरातील संजय नगर मधून सानिया जावेद पठाण वय 22 ही तरुणी 30 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यरात्री 2 ते 3 च्या दरम्यान घरात कुणालाही न सांगता निघून गेली आहे. घरच्यांना जेव्हा हे समजले त्यांनी तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही शेवटी कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.



















