सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सिनेट निवडणूक गुरुवारी होत आहे. विविध मतदारसंघातील ३८ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात आहेत.
मतदानासाठी रांगच रांग दिसून आली. मतदानासाठी मोठी गर्दी होती, पोलीस बंदोबस्त नव्हता, विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतेही नियोजन नव्हते, संगमेश्वर कॉलेज परिसरात ट्राफिक जाम झाल्यानंतर पोलिसांना यावे लागले. अनेक उमेदवारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.




















