सोलापूर : सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याचे प्रभारी पद ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शुक्रवारी दत्तात्रय भरणे यांनी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.
प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन झोपडपट्टीत फिरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकाच्या मनात रुजवण्याच्या सूचना आमदार भरणे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजन काय याबाबत ही त्यांनी भाष्य केले.
भरणे हे पालकमंत्री असताना टक्केवारी घेऊन सोलापुरात काम दिली असा आरोप भाजपने केला आहे. या आरोपाचे त्यांनी खंडन करत खोके, टक्केवारी आणि डोंगरावरची माणसं वेगळी आहेत बाबा असे सांगतानाच जितका निधी दिला ती सगळी काम झाली ना असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. महेश कोठे, आनंद चंदनशिवे हे आमचेच आहेत या बैठकीला ते हजर होते त्यामुळे त्यांच्या बाबत गैरसमज नको असेही ते म्हणाले…..
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...