सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेने जिल्हा परिषदेच्या समोर असलेल्या खोक्यांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली आहे. अन्यथा आजपर्यंतचा 50 टक्के दंड भरा असे आदेश महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिले आहे. दरम्यान या प्रकरणांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मध्यस्थी करून हा विषय तात्पुरता थांबवला आहे.
गुरुवारी सुशिक्षित बेरोजगार जिल्हा परिषद खोकेधारक संघटनेच्या वतीने मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांची भेट घेत निवेदन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आमच्यावर होत असलेला अन्याय व आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष रोहिणी सलगर, उपाध्यक्ष लैला जमादार, सचिव प्रशांत जमादार, सहसचिव मनीष होटकर, कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, सदस्य विक्रांत शेंडगे यांच्यासह ठोकेदारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















