सोलापूर -सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर 2021 मध्ये 200 हून अधिक प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याने त्यातील बहुतांशी शिक्षकांच्या शाळा बदललेल्या आहेत. यातील अनेक शिक्षक नव्याने संवर्ग एक मध्ये आले असले तरी त्यांची शाळा बदलल्याने शाळेवरील तारीख हजर तारीख हे तीन वर्षाच्या आतील आहे.
यामुळे शासनाच्या बदली निकषानुसार या शिक्षकांना मागील तीन वर्षात संवर्ग 1 चा लाभ घेतले नसले तरी यांना बदली पोर्टल मध्ये बदली अर्ज करता येत नसल्याचे निदर्शनास आल्याने सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या गुरुसेवा परिवाराच्या वतीने शिक्षणाधिकारी संजय जावीर यांची भेट घेऊन या शिक्षकांना बदली पोर्टलमध्ये बदली मागण्याचे अधिकार द्या अन्यथा न्यायालयात जाऊ यासाठी परवानगी द्या अशी मागणी केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस सूर्यकांत हत्तूरे ( डोगे ) यांनी दिली.
तब्बल दोन वर्षानंतर प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली असून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत संवर्ग 1 मधील शिक्षकांना पोर्टलवर अर्ज करण्या ची मुदत दिलेली आहे. या अनुषंगाने बदलीसाठी अर्ज करीत आहेत. अर्ज भरताना ही बाब शिक्षकांच्या लक्षात आलेली आहे.
शासनाच्य दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयात 4.2.7. मध्ये विशेष संवर्ग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असा उल्लेख असतांना या शिक्षकांनी यापूर्वी या बदलीचा लाभ घेतलेला नाही.यांची पदोन्नतीने शाळा बदललेली आहे. तेव्हा यांनी बदलीचा लाभ घेतले आहे असे म्हणता येणार नाही म्हणून पदोन्नतीने बदललेली तारीख ग्राह्य न धरता यापूर्वीच्या बदलीची तारीख ग्राह्य धरून यांना संवर्ग 1 मधून बदलीचा लाभ देण्यात यावी. अन्यथा या विषयी दाद मागण्यासाठी न्यायालयात जाण्याकरिता परवानगी द्या असे या निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनाची प्रत सचिव ग्राम विकास मंत्रालय व vinsys या स्वाप्टवेअर कंपनीस मेलने पाठविला आहे.
यावेळी आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा नेते बाबा शेख, दक्षिण तालुका पतसंस्थेचे संचालक प्रकाश कुंभार, पिरप्पा हडपद, चंद्रकांत कमळे, आमसिद्ध बिराजदार, राजकुमार चाबुकस्वार आदीं उपस्थित होते.


















