सोलापूर – शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन परिवर्तन या कार्यक्रमात माझ्या मतदारसंघात ताडीची सर्वाधिक दुकाने असून अनेकजण विषारी ताडीने मृत्युमुखी पडले आहेत. आता ताडी हटाव मोहीम राबवावी लागेल असा इशारा दिला असतानाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार आडम मास्तरांनी ताडी केंद्रावर मोर्चा काढून आपला आक्रोश नोंदवला.
एक टक्का ताडी आणि 99 टक्के रसायन मिश्रित विषारी ताडी विक्री केंद्रांना परवाना राज्य उत्पादन शुल्क दिला जातो ही अत्यंत गंभीर आहे. नियम धाब्यावर बसवून परवाना देताना अधिकाऱ्यांचे हात काळे झाल्याचा आरोप ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांनी केले व 25 हजार नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून मुख्यमंत्री यांना सह्यांचे निवेदन सादर करत असल्याचे सांगितले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बापूजी नगर परिसरातील अभयहस्त चौक येथील विषारी ताडी विक्री केंद्राचा परवाना रद्द करा ही मागणी घेऊन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव ऍड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा बापूजी नगर कॉ.माशप्पा विटे मैदान पासून ते वनराज कट्टा – नवशक्ती तरुण मंडळ- गौरी माता मंदिर- ताशकंद चौक -महादेव मंदिर- शास्त्री नगर डॉ.अन्सारी चौक -भगतसिंग चौक – अभयहस्त चौक येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
तदनंतर पोलिसांनी आडम मास्तर यांच्या सह ऍड.एम.एच.शेख, नसीमा शेख, युसूफ मेजर, शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, अनिल वासम, अकील शेख, अशोक बल्ला, बालाजी गुंडे, डेव्हिड शेट्टी, शकील आगवाले, महिबूब गिरगांवकर, आसिफ पठाण, गोविंद सज्जन, श्रीनिवास भंडारे, हणमंतू पेद्दी, गोपाळ जकलेर, सुरेश गुजरे आदींना ताब्यात घेतले.


















