सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे सासरे नागनाथ स्वामी यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. नागनाथ स्वामी हे निवृत्त शिक्षक होते मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्ष होते. बरेच दिवस ते सोलापूर शहरात उपचार घेत होते. सोमवारी त्यांच्या विश्राम भवन नांदेड रोड,चाकुर या निवास स्थानावरून अंत्ययात्रा निघणार असून सकाळी 11 वाजता, अंत्यविधी चाकुर येथे होणार आहे.


















