सोलापूर : 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांच्या हस्ते कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन करण्यात आला. याप्रसंगी खमीतकार म्हणाले, महिला या सर्व क्षेत्रात सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्या कोणत्याही क्षेत्रात मागे नाही नाहीत. त्या पुरुषाच्या बरोबरीने कार्यरत आहेत.
याप्रसंगी समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी मोनिका हिरेमठ, वरिष्ठ लिपिक एस एस सुतार, कनिष्ठ सहाय्यक एन आर ढाळजी, परिचर जी एस राठोड या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सचिदानंद बांगर, अतुल मुकटे, शशिकांत ढेकळे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री शितल कंदलगावकर यांनी केली. सावळा काळे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


















