सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक मुख्यालयातील सर्व विभागाच्या कार्यालयांची पाहणी केली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाल्याचे पहायला मिळाले.
सकाळी अकरा वाजता सीईओ आव्हाळे यांचे जिल्हा परिषदेत आगमन झाले. त्यांचा कामकाजाचा पहिला दिवस असल्याने त्यांनी जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभाग पाहणी केली, स्वीय सहाय्यक मल्लिकार्जुन तलवार यांच्या सोबत अर्थ, सामान्य प्रशासन, कृषी, ग्रामपंचायत, यशवंतराव चव्हाण सभागृह, पदाधिकारी कार्यालय, पशुसंवर्धन, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, जलसंधारण, ग्रामीण पाणी पुरवठा असे सर्व विभागांची पाहणी केली. सीईओ मॅडम अचानक आल्याने कर्मचाऱ्याची पळापळ झाली. जिल्हा परिषदेत असणारे सार्वजनिक बाथरूम स्वच्छ ठेवण्याबाबत सक्त ताकीद त्यांनी दिली.
दुपारी बारा वाजले तरी काही अधिकारी कार्यालयात नव्हते त्यांना माहिती मिळताच ते पळत धावत आल्याचे पहायला मिळाले.



















