सोलापूर : केंद्रशासनाद्वारे आझादी का अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत 13 ते 15 9ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान असून सोलापूर जिल्ह्यातील उमेद अभियानच्या महिला प्रभाग संघांना दीड लाख झेंडे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सोलापूर शहरात जिल्हा परिषद, उत्तर सोलापूर पंचायत समिती तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा झेंडा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उमेद अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी, राहुल जाधव, संतोष डोंबे, भगवान कोरे, सुजाता मानगवकर, शीतल म्हनता, सूरज रत्न नदाफ, पूनम दुध्याळ, प्रमोद चिंचुरे, सादिक शेख, पोपट चौधरी उपस्थित होते.
दरम्यान अतिरिक्त सीईओ धोत्रे व डेप्युटी सीईओ पाटील यांनी जिल्हा परिषदेत तिरंगा झेंडा विक्रीची सोय करण्यात आली असून त्यांचा लाभ घ्यावा व 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरावर झेंडे लावावेत असे आवाहन केले…



















