सोलापूर : सिद्धेश्वर महिलांच्या पॉलिटेक्निकमधील तब्बल 27 मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या मुलींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रुपाभवानी चौकाजवळ सिद्धेश्वर वूमन्स पॉलिटेक्निक आहे. तिथे शिकणाऱ्या मुली कॉलेज परिसरात असलेल्या वसतिगृहात राहतात. मंगळवारी रात्री मुली जेवण करून झोपल्या दरम्यान मध्यरात्री मुलींना उचमाळू लागले, पोटात दुखू लागले त्यामुळे अनेकींना उलटी जुलाब झाले त्या तशाच झोपी गेल्या.
सकाळी नाष्टा केल्यानंतर पुन्हा उलट्या जुलाब होऊ लागले. एक एक म्हणत म्हणत तब्बल 27 विद्यार्थिनींना त्रास होऊ लागला. वसतिगृहाच्या प्रशासनाने काही मुलींना एसटी स्टँड परिसरातील सिद्धेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती मुलींनी सांगितली….

















