सोलापूर : सोलापूर शहर हे बेपत्ता युवक-युवती, महिलांचे शहर म्हणून पुढील काही दिवसात ओळखले जाते का? अशी भीती आता व्यक्त होत आहे. त्याला कारणेही तशीच आहेत प्रत्येक महिन्यात आठ ते दहा जण बेपत्ता झाल्याच्या बातम्या वाचण्यास मिळत आहेत. त्यामध्ये किती मिळून आले याची मात्र माहिती समोर येत नाही.
शहरातील लष्कर भागातील उत्तर सदर बझार येथून असिफ अल्लीसाब शेख हा युवक दिनांक एक डिसेंबर 2022 रोजी आपल्या राहत्या घरातून बॅग घेऊन कोणालाही न सांगता निघून गेला आहे. या बारा दिवसात कुटुंबीयांनी त्याचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे विचारपूस केली मात्र तो मिळून आला नाही. त्याच्या वडिलांनी सदर बजार पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे कोणाला आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


















