सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सुमारास गोंधळ उडाला. बाजार समितीने आलेल्या कांद्याचा काटा सकाळी आठ नंतर करावा असा नियम लागू केला आहे. त्याला हमाल कामगारांनी विरोध दर्शवला. हा काटा पहाटे पाचपासूनच सुरू होईल अशी भूमिका कामगारांनी घेतल्याने बराच वेळ गोंधळ झाला.
बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी या ठिकाणी येऊन कामगारांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कामगार आपल्या म्हणण्यावर ठाम दिसून आले.
शेतकऱ्यांचा आलेला कांदा काटा आणि लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांना कांदा कमी मिळतो कांदा चोरीला जात असल्याचा संशय आणि तक्रार व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे केली होती.



















