Wednesday, March 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून सामाजिक सलोख्याचे दर्शन ; शांतता कमिटीच्या बैठकीत दिलेला शब्द पाळला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 September 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



 

सोलापूर, दि. 28 ( जिमाका):- गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक सलोखा व ऐक्याची भावना चांगली राहावी व सण-उत्सव जिल्ह्यात अत्यंत उत्साहाने साजरे करावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुका व जिल्हास्तरावर शांतता समितीच्या बैठका घेऊन सर्व समाजातील पदाधिकारी, प्रतिनिधी, मौलवी, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले. 


त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील गणेश मंडळांना भेटी देऊन तेथे श्री गणेशाची आरती केली तसेच गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेऊन काढावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाने ईद-ए-मिलाद ची दिनांक 28 सप्टेंबर रोजीची सुट्टी ही 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा करणार असल्याने 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर गणेश उत्सव विसर्जन मिरवणूकसाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्तरावर दिनांक 28 सप्टेंबर रोजीची सुट्टी जाहीर करून हा सण नागरिकांना उत्साहाने व शांततेने साजरा करता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत.


त्याप्रमाणेच बोरामणी व मंद्रूप येथील प्राचीन मस्जिद येथे भेट दिली. तसेच येथील मौलवी व मुस्लिम धर्मातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. सामाजिक सलोखा राखण्याबाबत सर्वांना आवाहन केले. ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात येत असते, त्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत त्या ठिकाणी दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी दारूबंदीचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. गणेश उत्सव मिरवणूक व ईद-ए-मिलाद सण एकाच दिवशी आल्याने मुस्लिम समाजाने त्यांचा सण विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्याची ठरविल्याबद्दल त्यांनी मुस्लिम समाजातील नागरिकांचे अभिनंदन केले. 

परस्परांच्या सण-उत्सवाचा आदर ठेवून समन्वयाची भूमिका दोन्ही समाजाकडून घेऊन मुस्लिम समाजाने आपला सण दुसऱ्या दिवशी साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या समन्वयातून सोलापूर जिल्ह्याची शांतताप्रिय जिल्हा ही संपूर्ण राज्यात असलेली ओळख महत्त्वाची ठरते. ही फक्त ओळख नसून  शांतताप्रिय सोलापूर जिल्हा ही संस्कृती असल्याचे त्यांनी म्हटले. ही शांततेची संस्कृती टिकून ठेवण्यासाठी सर्व धर्मीयांनी यापुढील काळातही परस्परात समन्वय ठेवावा, परस्परांच्या रूढी परंपरांचा आदर करावा, परस्परात बंधुभाव वाढवून एकमेकांच्या उत्साहात एकत्रित येऊन आनंद साजरा करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज मंद्रूप येथील जय सेवालाल तरुण गणेश मंडळ, बोरामणी येथील जय भवानी तरुण मंडळ, कुंभारी येथील जय मार्कंडेय एकता गणेश मंडळ, सोलापूर शहरातील पुण्यनगरी वृत्तपत्र येथील गणपती या सर्व मंडळांना भेटी घेऊन येथे गणपतीची आरती ही केली. तसेच बोरामणी येथील दत्त मंदिर येथे भेट दिली व येथील नागरिकांशी चर्चा केली. त्याप्रमाणेच मंद्रूप येथील जामा मस्जिद व बोरामणी येथील जामा मस्जिद यांनाही भेट देऊन सर्व नागरिकांशी चर्चा करून त्यांना सण उत्सव आनंदाने साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक व  ईद-ए-मिलादच्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंद्रूप येथील जय सेवालाल तरुण गणेश मंडळाच्या परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

पोलीस व महापालिकेची नजर चुकवून संभाजी तलावाच्या धोबी घाटाकडे होऊ लागले विसर्जन

Next Post

तुमची मोटारसायकल चोरीला गेली का? सोलापुरात 5 गुन्हे उघडकीस आले आहेत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

तुमची मोटारसायकल चोरीला गेली का? सोलापुरात 5 गुन्हे उघडकीस आले आहेत

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973106
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group