सोलापूर : सोलापूरच्या कीर्ती भराडियाने सलग सात तास 21 मिनिटं मुंबईतील समुद्रात स्विमिंग करून तब्बल 38 किलोमीटरचे अंतर पार केले. बुधवारी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने कीर्तीचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत कटारे, सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, उपाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, सदस्य सत्यनारायण गड्डम, दत्तात्रय बोल्लू हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना कीर्ती म्हणाली, माझ्या या यशात माझ्या परिवारासह माझ्या प्रशिक्षकांचा वाटा मोठा आहे. डिजिटल मीडियाने सुद्धा सपोर्ट केला त्यामुळे मी देशभरात जाऊ शकले.
सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर 36 किलोमीटर असले तरी समुद्रात लाईट हाऊस म्हणून भाग आहे तिथे ओहोटी मुळे खडक लागला म्हणून 2 किलोमीटर अंतर वाढून ते 38 किलोमीटर झाले. आता माझे पुढचे ध्येय हे श्रीलंका ते रामेश्वरम हे 51 किलोमीटर अंतर स्विमिंग करून पार करायचे आहे त्यानंतर गंगासागर हे 80 किलोमीटर पोहायचे असल्याचा मानस किर्तीने केला.