सोलापूर : ठाकरे गटातील युवासेना उपजिल्हाप्रमुख काशी विभुते हे सेना सोडून भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच माजी मंत्री ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख व जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ते भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
युवासेना सोडण्यामागील खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. ते म्हणतात,
मी सन 2012 पासुन सेनेच काम करतो. अनेक युवासेना शाखा काढल्या व युवासेना तर्फे अनेक उपक्रम राबवले, प्रत्येकापर्यंत शिवसेना युवासेना घरोघरी पोहोचवली, अनेक मोर्चे काढलो, अंगावर केसेस सुध्दा घेतल्या,
माझ काम बघून त्यावेळेचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मला 2016 ला युवासेना अक्कलकोट तालुका प्रमुख पदावर निवड केली. मी अजून जोमाने सेनेच काम केले, यात माझे खूप खच्चीकरण झाले तरी माझे काम मी थांबवले नाही.
परत 2020 साली युवासेना उपजिल्हाप्रमुख पदावर निवड झाली. पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यानंतर अजून जोमाने काम करत राहिलो. पक्षातील लोकाना हे बघवेना झाले म्हणून त्यांनी मला पक्षाच्या उपक्रमात डावलण्यास आणि पक्षातून लांब करायचा प्रयत्न चालू झाला आहे. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन भाजप पक्षात जाण्याचा विचार केला असून लवकरच मी भाजपात प्रवेश करणार आहे.



















