सोलापूर : पोलीस असल्याचा बनाव करून रस्त्यावरील गाड्याना अडवून तसेच हात गाड्याकडून पैसे घेणाऱ्या होमगार्डवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र किसन आयवळे रा- सोलापूर असे आरोपी होमगार्डचे नाव आहे. श्रीकांत चंद्रकांत गायकवाड राहणार एनजीमिल चाळ मुरारजी पेठ सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे १४ सप्टेंबर २०२२ रोजी साडे पाच वाजण्याच्या सुमारास सेवासदन हायस्कूलचे समोर सरस्वती चौक, जवळ फोन आल्याने गाडी बाजूला घेऊन थांबले असताना आरोपी हा होमगार्डचा ड्रेस त्यावरती जरकीन घालून पोलीस असल्याची भिती दाखवून फिर्यादीजवळ येऊन फिर्यादीस तुझ्या गाडीचे आरसी बुक आणि लायसन्स दाखव नाहीतर ५०० रूपये काढ असे म्हणून फिर्यादीकडून ५०० रूपये घेतले. त्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या शेंगा फुटाणे व आईस्क्रीम विक्री करणारे व्यक्तीजवळ जावून तुम्ही येथे गाडी लावायची नाही तुम्हाला जर येथे गाडी लावायची असेल तर मला ५०० रूपये फाईन दयावे लागेल असे म्हणून त्यांच्याशी वाद घालून त्यांच्याकडून २०० रूपये फाईन म्हणून घेतले. त्यावेळीस फिर्यादीस सदरचा इसम पोलीस नसल्याचा संशय आल्याने त्यांनी फोन करून पोलीस ठाणेकडील बिटमार्शल यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले व बिट मार्शल येवून सदर इसमाकडे चौकशी केली असता तो पोलीस नसून होमगार्ड असल्याचे समजले. सदर आरोपीत मजकूर यांने तो पोलीस नसताना पोलीस असल्याची भिती घालून फिर्यादी व शेंगा फुटाणे व आईस्क्रीम विक्री करणाऱ्याकडून रक्कम घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार चौगुले करीत आहेत.
.jpg)


















