सोलापूर – मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा चालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक-दोन घटना नसून अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत.
जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध आणि नराधम ‘लव्ह ‘जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्धवस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, जिल्हा परिषद येथे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली.
या प्रसंगी ‘रणरागिणी शाखेच्या समन्वयक अलका व्हनमारे यांसह हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे, दत्तात्रय पिसे, धनंजय बोकडे, सुरज मदनावाले यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी शहरातील धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या!’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या.



















