सोलापूर : सोलापुरात युवक पॅंथरच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शुभम बंगाळे, आदित्य वाघमारे, विकास सोनवणे, विश्वास नागमोडे, मुकेश बनसोडे, तुकाराम भोसले, सागर गायकवाड यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान दीपक गवळी म्हणाले, सोलापूर समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक आयुक्त यांनी आश्रमशाळांना बेकादेशीरपणे अनुदान वाटप केले आहे एका शिपायामार्फत कोट्यावधीतचा पैसा गोळा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला..



















