सोलापूर – सोलापूर येथील यंत्रमाग धारक गोवर्धन श्रीकोंडा यांच्या कारखान्यात तब्बल वीस वर्षापासून कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांना त्यांची देय रकमा न देता कारखाना विक्रीस काढून कारखान्यातील सुट्टे भाग विकले. या दरम्यान कामगारांना थकीत देयरकमा देणार असे आश्वासन देऊन फसवणूक केली. म्हणून यंत्रमाग कामगार लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन्स च्या माध्यमातून कॉ.युसूफ मेजर व माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी यांच्या नेतृत्वाखाली श्रीकोंडा कारखानदार यांच्या दाजी पेठ येथील कारखाना येथे धरणे आंदोलन करताना जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतले.
यावेळी किशोर मेहता अँड.अनिल वासम, शहाबुद्दीन शेख, मोहन दूडम, सह अंबादास शावंतुल,सगुणाबाई आडम, गुरुनाथ नल्ला,अशोक पामुल, व्यंकटेश गरदास, प्रभाकर गड्डम ,महेश गुडगुंटिकर,श्रीनिवास गंगूल, रवींद्र बिच्छल,हनुमंतू जगपारी आदींचा समावेश आहे.



















