सोलापूर : शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही जवळ तलवार बाळगल्याच्या आरोपावरून माजी नगरसेवक प्रथमेश महेश कोठे राहणार मुरारजी पेठ यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीसांनी कारवाई केली असून भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ फेब्रुवारी रोजी हिंदु संघटनांनी लव्ह जिहाद विरोधात काढलेल्या गर्जना मोर्चामध्ये सायंकाळी ६ च्या सुमारास माणिक चौक भागातून जाताना प्रथमेश कोठे त्यात सहभागी झाले. यांच्याकडे लालरंगाचं कव्हर असलेली तलवार होती. त्यांनी ही तलवार कव्हर मधून काढून हवेत फिरवली. अशी फिर्याद पोलीस शिपाई विनोद व्हटकर यांनी दिली आहे. या आधीही मोर्चातील काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.


















