सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षणप्रसारक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील या थोर समाज सुधारकांच्या बाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांच्या विरोधात बुधवारी आंबेडकर चौक येथेव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळ, सोलापूरच्या व सोलापूर शाहर-जिल्ह्यातील भिम सैनिकांच्या वतीने विराट मोर्चा व निदर्शने करण्यात आली.या मोर्चात सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिला, युवकांसह अनेक भीमसैनिक सामील होते. घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून गेला होता. हा मोर्चा डॉ आंबेडकर चौकात आल्यानंतर याठिकाणी नेत्यांची भाषणे झाली.
चंद्रकांत पाटील या भाजपा पक्षाच्या मंत्र्यांनी बेतालवक्तव्य केल्याने तमाम भिमसैनिकांच्या तमाम भारतीय जनतेच्या भावना तीव्रपणे दुखावल्या असून चंद्रकांत पाटलांवर भारतीय संविधान तरतूद प्रचलित लागू कलमाद्वारे व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा व महामहिम राज्यपाल महोदयांची केंद्र सरकार व महामहिम राष्ट्रपती यांनी उचलबांगडी करावी तसेच चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ राजीनामा घ्यावा. यापुढे अशी बेताल वक्तव्ये होवू नये याची दक्षता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी अशी मागणी आनंद चंदनशिवे यांनी केली…
या मोर्चात बाळासाहेब वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, सकल मराठा समन्वयक माऊली पवार, संभाजी आरमार अध्यक्ष श्रीकांत डांगे, माजी सभापती राजन जाधव, माजी सभापती नाना मस्के, रिपाइं नेते प्रमोद गायकवाड, विजयकुमार हत्तुरे, रॉकी बंगाळे, केरू जाधव, अजित बनसोडे, एन के क्षीरसागर, दशरथ कसबे, शांतिकुमार नागटीळक, मिलिंद प्रक्षाळे, बाबा बाबरे, दयानंद बनसोडे, विनोद वाघमारे, अमोल गोडसे, अविनाश भडकुंबे, शिरीष सर्वगोड, सुहास सावंत, पप्पु गायकवाड, रविकांत कोळेकर, गौतम चंदनशिवे, चाचा सोनवणे, लखन भंडारे, समीर पांडगळे, एन.के. क्षीरसागर, अनिल वाघमारे, संतोष सोनवणे यांच्यासह हजारोंच्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते.



















