Sunday, March 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात पहिले आयटी पार्क मार्च अखेर युनिट उभे राहणार , तब्बल इतक्या कोटीची गुंतवणूक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 August 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



सोलापुर : येथील डोणगाव रस्त्यावरील ६५ एकर जागेत आर्यन्स ग्रुपच्या माध्यमातून आठशे कोटींची गुंतवणूक करून पहिले आयटी पार्क साकारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन येत्या 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर महेश कोठे व आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.


 रविवारी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत. पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया, सतीश मगर, आर्यन ग्रुपचे चेअरमन मुकुंद जगताप, आर्यन ग्रुपचे एमडी स्मिता जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


या आयटी पार्कमध्ये आयटीसी संलग्न अशा विविध कंपन्या येणार आहेत. तसेच तयार करणाऱ्या कंपनीचादेखील समावेश आहे.  मार्च अखेर या आयटी पार्कचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. त्यानंतर दहा ते पंधरा हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे कोठे यांनी सांगितले


या आयटी पार्कमुळे शहरात आयटी क्षेत्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. या आयटी पार्कच्या माध्यमातून मोठ्या आयटी कंपन्या, आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्स, उद्योजक आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगांना आकर्षित केले जाणार आहे. या माध्यमातून सोलापूरमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी एक पोषक वातावरण तयार होणार असल्याच  कोठे यांनी सांगितले


पार्कचे भूमिपूजन झाल्यानंतर  महिन्यात सोलापूरच्या आयटी तरुणांना येथे नोकरी मिळेल. पहिल्या टप्प्यात टेक्निकलच्या दीड हजार तर नॉन टेक्निकलच्या तीन हजार तरुणांना सुरुवातीच्या वर्षांमध्ये काम मिळेल. तीन वर्षांमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यानिमित्ताने मी गेल्या सहा वर्षांचे स्वप्न पूर्ण करत आहे. आता इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी करून दाखवावे आणि शहराच्या विकासात भर घालावी, असे आवाहन माजी महापौर महेश कोठे यांनी केले.


आर्यन्स ग्रुप क्षेत्रात काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर देखील काम करत आहे. कंपनी पूर्णतः भारतीय बनावटीचे सर्च इंजिन बनवणार आहे. कंपनीसाठी हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.. कारण गुगल किंवा इतर सर्च इंजिन देशाबाहेरील आहेत. ज्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक सुरक्षेचा विषय आहे. याबरोबरच कंपनी भारतीय बनावटीचे वेय ब्राउजर देखील बनवत आहे. जे पूर्णपणे सुरक्षित असेल. आयटी पार्कसह इतर प्रकल्पांसाठी जागा मिळाल्यास ८०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार आहे. 


या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे, प्रमोद गायकवाड, संजय शेडगे, महेश चिलवेरी, शेखर शहाणे यांची उपस्थिती होती.


आर्थिक विकासाला चालना

आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी शहरामध्ये आयटी पार्क उभारत आहे. ही आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणेमुळे आम्हाला हे साध्य करणे शक्य झाले आहे. या अत्याधुनिक आयटी पार्कच्या माध्यमातून या भागात आर्थिक विकासाला चालना तर मिळणार आहेच, त्याबरोबरच रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण होणार आहे. आयटीआय क्षेत्रातील टर्नर  फिटर सह अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत त्याशिवाय व्यापार वृद्धींगत होण्यासाठी या आयटी पार्कमुळे मदत होणार आहे सोलापूरची आर्थिक  विकास होण्यास   मदत होणार असल्याचे  कोठे यांनी सांगितले.


सिंगापूरच्या धर्तीवर इमारत उभी करणार

आयटी पार्कची ही  इमारत आयटी पार्क ही इमारत सिंगापूरच्या धर्तीवर उभारण्यात येणार असून आणि या ठिकाणी तयार होणारे रोबोट, ज्वेलरी, किचन, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये व अन्य सर्व ठिकाणी त्याचे काम चालेल सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत अशी माहिती  आर्यन ग्रुपचे संचालक संजय शेंडगे यांनी दिली.

SendShareTweetSend
Previous Post

दुःखद ! पुष्पवती शिवाजी म्हेत्रे यांचे निधन

Next Post

पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ; सोलापुरात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ; सोलापुरात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आक्रमक

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972913
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group