सोलापूर प्रशासनात अनेक अधिकारी येतात जातात. मात्र काही अधिकारी हे नागरिकांच्या मनात घर करुन जातात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. काही वादग्रस्त ठरतात तर काही जण आपल्या चांगल्या कामाने छाप पाडतात. असाच एक अधिकारी काही दिवसापूर्वी सोलापुरातून बदली होऊन गेलेला आता लगेच त्यांना महापालिका आयुक्त होण्याचे स्वप्न पडले असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे हा अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरातील एका ‘काळजी’ वाहकाकडून प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. सोलापुरात या अधिकाऱ्याने कचऱ्यातून चांगलेच ‘धन’ कमावल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी कोरोना काळात या अधिकाऱ्याला एक महत्वाची जबाबदारी दिली होती.
त्यांच्यासह अख्खे कुटूंब कोरोना पॉझीटीव्ह झाले तरीही त्यांनी तमा न करता जिददीने काम केले, त्यांच्या कामाचे कौतुक होऊ लागले, माध्यमांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतले, काही ठराविक पत्रकारांनी त्यांच्यासाठी बरेच प्रयत्न केले. पालकमंत्री, आमदार, प्रदेश प्रवक्त्यांपर्यंत पत्रकारांनी त्यांना आहे त्याठिकाणी पोस्टिंगसाठी प्रयत्न केले. आणि अपेक्षित नसताना एका मोठया पदावर त्यांना बसवले.
रोज बातम्यात ते अधिकारी दिसू लागले. नंतर मात्र त्यांच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली. माझी रोज बातमी पेपरमध्ये छापून यावी, न्यूज चॅनलमध्येही मी रोज दिसावा असे त्यांना वाटू लागले. महापालिकेत एकाच पदावर सलग दोन वर्ष काढले. त्यांनी या काळात चांगलेच ‘धन’ त्यांनी कमावले. आता त्यांची बदली झाली आहे. मात्र केवळ चार ते पाच महिन्यातच त्यांना थेट महापालिकेत आयुक्त म्हणून येण्याची स्वप्न पडत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.



















