सोलापूर – सोलापूर शहरात दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. आपल्या राहत्या घरात एका 23 वर्षीय तरुणीने व एका 18 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
रुपाली इराप्पा संभारम वय 23 (राहणार दत्तनगर दाजी पेठ सोलापूर) व ओम संजय मोरे वय १८ (राहणार अभिमान श्री नगर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचे नाव आहे.
रुपाली हिने राहत्या घरी अज्ञात कारणातून घराच्या छताला असलेल्या फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्यास त्याची आई व मदतनीस राहुल कोंडा यांनी खाली उतरून बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले आहेत. या आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचे प्राथमिक सिव्हील पोलीस चौकी येथे झाली आहे.
तर ओम हा बुधवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणातून ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्यास खाली उतरून पोलीस नाईक सचिन घुगे नेमणूक फौजदार चावडी पोलीस ठाणे यांनी बेशुध्द अवस्थेत यादीसह उपचारासाठी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालय दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.



















