सोलापूर : महाराष्ट्रात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी राज्यभर आंदोलन केली. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आयटक अंतर्गत काम करणाऱ्या सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर ज्येष्ठ कामगार नेते कॉ तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनखाली हे आंदोलन झाले. महसूल कर्मचारी संघटनेचे नेते अशोक इंदापुरे, शंतनू गायकवाड यांनी या आंदोलनाला येऊन पाठिंबा दिला. या आंदोलनात जिल्हा सचिव ए बी कुलकर्णी, रशीद इनामदार, सतीश गायकवाड, संतोष जमादार, हूआण्णा पुजारी याच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभय यावलकर समितीच्या शिफारशी मान्य करा आणि त्याची करुन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन सहित अन्य वेतन विषयक लाभ द्या,
१० ऑगष्ट २०२० रोजी मान्य केलेले वाढीव किमान वेतन मार्च २०१८ पासून लागू करा आणि त्यांच्या वाढीव फरक बिलांची ५७ महिण्यांची थकबाकी दया, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले दरम्यान संघटनेचे सचिव कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली.



















