सोलापूर : बारावीची परीक्षा मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ ते मंगळवार २१ मार्च २०२३ या काळात होईल, तर दहावीची परीक्षा गुरुवार २ मार्च २०२३ ते शनिवार २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडेल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली.
जिल्हाधिकारी शंभरकर अधिक माहिती देताना म्हणाले, कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी नांदेड पॅटर्न राबविण्यात येणार आहे. यंदा परीक्षेत भरारी पथकासह बैठे पथक राहणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 43 परीक्षा केंद्रे ही संवेदनशील आहेत. त्यावर विशेष लक्ष राहणार असून 3 पोलीस बंदोबस्त साठी असतील. मुलांना मोबाईल बंदी, केंद्र परिसरात झेरॉक्स दुकाने बंद राहतील.
महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग तसेच पोलीस प्रशासन यांचे संयुक्त पथक राहील. यंदाच्या दहावी आणि बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले पहा ते काय म्हणाले…



















