सोलापूर : होटगी रोडवरील मोहितेनगर जवळील भिमा विकास ऑफीसचे समोर घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून आणखी ०२ पिडीतांची मुक्तता केली.
बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने या बातमीवरून दि. ३० ऑगस्ट २०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरिक्षक कुरी यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचून मोहिते नगर पाठीमागील मिना विकास ऑफीसचे समोरील घरात बोगस गिन्हाईक पाठवून बातमीची खात्री करून दुपारी दीडच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला.
यातील महिला आरोपी नामे १) रेखा शिवाजी काळे वय ४५ वर्षे राहणार अपना बझारचे पाठीमागे निर्मला हॉस्पिटल जवळ विजापूर रोड सोलापूर (एजंट) २) आकाश महादेव सावंत वय २५ वर्षे राहणार मोहिते नगरचे पाठीमागे भिमा विकास ऑफीस समोर सोलापूर (एजंट) ३) अभिजीत गोपाळ घाडगे वय २८ राहणार मोहिते नगरचे पाठीमागे भिमा विकास ऑफीस समोर सोलापूर (एजंट) हे एजंट घरमालक महिला आरोपी नामे हिराबाई महादेव सावंत वय ६६ राहणार सदर (घरमालक) हे पिडीत ०२ महिला यांची पिळवणूक करुन त्याना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांचेकडून वेश्या व्यवसाय करवून घेवून त्याचे येणारे कमाईवर स्वतःची उपजिविका करीत असताना मिळून आले.
सदर आरोपीविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाणे येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ सह भादविसंक. ३७० (अ) (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक श्रीमती कुर्री या करीत असून आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची गुन्हयाचे तपासकामी ०३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
.jpeg)



















