सोलापूरात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये निर्माण झालेला वाद दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी एकत्रित बैठक घेऊन मिटवला.
गेल्या काही दिवसापासून सोलापूर लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं होतं,आमदार प्राणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार असं म्हणत त्यांना पोरकट संबोधले होते त्यामुळे दोन्ही पक्षातील युवक आमने सामने आले होते, त्यामुळे वाद चिघळला होता.
दरम्यान हा वाद थांबवण्यासाठी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष भारत जाधव यांच्यात सोमवारी बैठक झाली या बैठकीत दोन्ही पक्षातील युवा नेत्यांनी एकमेकांविरोधात वक्तव्य करू असे एकमताने निर्णय घेऊन भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ न देता आघाडी म्हणून एकत्रित काम करण्याचा निर्धार करण्यात आला,दरम्यान काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना वादावर पडदा पडल्याचं सांगताना,यापुढे वक्तव्य करताना अध्यक्षांना कळवावे असं आवाहन यावेळी करताना यापुढे भाजप विरोधात महाविकास आघाडी म्हणून एकदिलाने काम करू अस ते म्हणाले.
याप्रसंगी माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी, प्रमोद गायकवाड, जनार्दन कारमपुरी, शंकर पाटील, शफी इनामदार, विनोद भोसले, तिरुपती परकीपंडला, बाबा करगुळे यांची उपस्थिती होती.




















