सोलापूर – माकप, सिटू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, DYFI, SFI, किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 9 मार्च दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तू व घरगुती गॅसदरवाढ आणि जनता व देशविरोधी अर्थसंकल्प विरोधात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर व सिटूचे राज्य महासचिव एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी काळे वस्त्र परिधान करून काळ्या फिती लावून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोदी अमित शहा मुर्दाबाद, महिलांवरील अत्याचाराचा धिक्कार असो, लवजिहाद धर्मांतर गोवंश हत्येच्या नावाखाली निष्पापांचा बळी घेणे बंद करा, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्या, वाढीव वीजदर रद्द करा, देश विरोधी अर्थसंकल्प हाणून पाडा, बेरोजगार भत्ता अदा करा, कामगार कायद्याची अंमलबजावणी करा अशा अनेक न्याय हक्काच्या मागण्या घेऊन गगनभेदी आवाजात घोषणा देत काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.
आडम मास्तर म्हणाले, आजची महागाई आकाशाला भिडलेली आहे,घरगुती इंधन आणि वाणिज्य इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. लोकप्रतिनिधींची कोट्यवधी रुपयांची विजेची थकबाकी असताना त्याची वसुली करण्यास यंत्रणा कमी पडते मात्र सर्वसामान्यांना न परवडणारी वीजदर वाढ करून गोरगरिबांची चेष्टा सरकारकडून होत आहे. महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची मालिका चालूच आहे, रक्त सांडून मिळवले कामगार कायदे धुळीला मिळवले,धर्मांधतेला प्रोत्साहन दिले जात आहे, जनता आणि देश विरोधी अर्थसंकल्प सादर करून खोटी आश्वासने दिली जात आहेत.
देशाला अधोगतीकडे नेणाऱ्या भ्रष्ट अदानी अंबानीचा महापूर रोखण्यासाठी मोदीसरकारचा पायउतार करा अन्यथा देश भुकेकंगल होईल. याचा मुकाबला करण्यासाठी 5 एप्रिल रोजी दिल्ली येथे संसदेवर आक्रोश मोर्चा धडकणार असून सरकारला सळो की पळो केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही असा निर्धार माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक युसुफ मेजर यांनी केले. यावेळी नसीमा शेख, सिध्दप्पा कलशेट्टी, अशोक इंदापुरे, दत्ता चव्हाण, मल्लेशम कारमपुरी आदींनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.
व्यासपीठावर कमिनीताई आडम,नलिनीताई कलबुर्गी, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, अँड.अनिल वासम,म.हनिफ सायखेड, मुरलीधर सुंचू आदींची उपस्थिती होती.
यावेळी विल्यम ससाणे, शकुंतला पाणिभाते, लिंगव्वा सोलापूरे, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला, गजेंद्र दंडी, अशोक बल्ला, किशोर मेहता, दाऊद शेख, आसिफ पठाण,इलियास सिद्दीकी, अकिल शेख, बाबूलाल फनिबंद, कादर शेख, सनी शेट्टी, दीपक निकंबे, श्रीकांत कांबळे, अमित मंचले, शाम आडम, शहाबुद्दीन शेख, आरिफ मनियार, गीता वासम, नागेश म्हैत्रे, बालाजी गुंडे, नरेश गुल्लापल्ली, चंटी बिटला, अकबर लालकोट, किशोर गुंडला, मल्लिकार्जुन बेलियार, बालाजी तुम्मा, डेविड शेट्टी, परशुराम बुगले, बालाजी म्हैत्रे, दिनेश बडगू, प्रकाश जगले, इमाम शेख, जैद मुल्ला, नागेश महेशन, नागनाथ जल्ला, सद्दाम बागवान, राजू सीता, सुरेश गुजरे आदींनी परिश्रम घेतले.


















