Sunday, March 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात अवैध धंद्यांविरोधात लक्षवेधी आंदोलन ; या युवा संस्थेने वेधले सर्वांचे लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 August 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सोलापूर शहरातील राजरोसपणे चालणाऱ्या मटका, जुगार दारू,गुटखा व इतर अवैध धंद्याच्या विरोधात संघर्ष सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अयाज शेख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवैध धंदे बंद करा यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. 

शहरात खुले आम मटका, जुगार व सर्व प्रकारचे अवैध धंदे  राजरोसपणे खुलेआम सुरू आहे सोलापूर शहरात सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत, न्यायालय समोर , कॉलेज समोर , चौका-चौकात सुरू असताना पोलीस प्रशासन झोपा काढत आहे काय ? असा संतापजनक सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावेत संबंधितावर कडक कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा परिषद पूनम गटे समोर  ‘बेधडक धरणे आंदोलन’ मोर्चा काढण्यात आला.आम्हाला रक्षक हवा आहे,भक्षक नको, काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे शहरात अवैध धंदे वाढत असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहे.त्यामुळे यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात याचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे.!

अवैध धंदे तरुण पिढीला बिघडवण्याचे काम करत आहेत.सकाळी उठून व्यायाम करण्याऐवजी मटका ,जुगाराचा अड्डा, शोधायची वेळ भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तरुणांवर आणली आहे.वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा शहरात सुरू असलेले धंदे बंद करा म्हणून .त्याकडे डोळेझाक केली जात आहे. 

अवघ्या दहा वीस रुपयांचा मटका ,दारू तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त करत आहे.याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा दोन दिवसात अवैध धंदे बंद करा,अन्यथा पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात येईल ,असा इशारा यावेळी दिला.

शहरात पोलिस आयुक्त सहकाऱ्यांसमवेत अमृत महोत्सवाचा  आनंद लुटत असले तरी शहरातील जनता मात्र अवैध धांद्यामुळे आनंदोत्सव साजरा करू शकत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. देशात नुकताच आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा हे अभियान राविण्यात आले. अवैध धंदे बंद करण्याचे पाऊल उचलले असते, तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळाला असता. परंतु या देशातील नागरिक आता पूर्णपणे अवैध धंद्याला कंटाळून गेले आहेत. दिवसेंदिवस शहरातील अवैध धंदे  वाढतच चालले आहे. आता या अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरिकांच्या आत्महत्या होण्याची पोलीस प्रशासन वाट पाहत आहे काय ? असा संतापजनक सवालही अयाज शेख यांनी उपस्थित केला.

यावेळी, तमजित गोगी, रवींद्र बनसोडे,झहीर कुरेशी, शाहबाझ मुत्वल्ली, मशाक तांबोळी, सद्दाम बिजापुरे रियाज पटेल,ख्वाजा शेख,अल्ताफ शेख,अकील पठाण,सोहेल पठाण, तोफिक बागवान, रेहान गदवाल, आरिफ चांदा,अजय काळे,शुकुर तांबोळी, तौफिक चांदा, जितेश स्वाके,बालाजी लंचपल्ली ,रिजवान गदवाल , जुबेर मुल्ला,अझहर शेख,मुसा शेख,इस्माईल आर्या, अमन मौलवी, अजीम शेख, यासर पठाण,इस्माईल शेख,शोहेब शेख, साजिद शेख,शाहिद शेख, शाहनवाज छुरी, आसिफ चौधरी, गौस शेख, व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग | अमोल शिंदे व मनीष काळजे यांना मोठी संधी ; दोघे शिंदे गटाचे नवे जिल्हाप्रमुख | Solapur

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ; ही मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी दिले बैठक लावायचे आश्वासन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ; ही मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी दिले बैठक लावायचे आश्वासन

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973001
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group