सोलापूर : शहरातील बापूजी नगर येथे राहणारी 18 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. तिच्या वडिलांनी याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
निकिता लक्ष्मण जंगम असे त्या मुलीचे नाव आहे. निकिता ही शुक्रवार 23 डिसेंबर 2022 सकाळी 11 वाजता घरातून कोणासही न सांगता निघून गेली आहे ती परत आलीच नाही. घरच्यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र मिळून आलीच नाही. सदर मुलगी दिसून आल्यास सदर बझार पोलीस ठाण्यास 02172744641 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



















