सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे विविध उपक्रम, नवनवीन अभियान राबवण्यासाठी प्रयत्नशील असतात. सोलापूर जिल्हा परिषदेमधील आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी अनेक नवीन संकल्पना पुढे आणल्या आहेत.
आता सोलापूर जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलली असून जीवनाची हमी, बालमृत्यू कमी हा नवा उपक्रम त्यांच्या संकल्पनेतून पुढे आला आहे. शुक्रवारी त्यांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य व महिला बालकल्याण विभागाची बैठक घेतली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शितल जाधव, माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल ऑफिसर यांची उपस्थिती होती.
हा उपक्रम राबविण्यामागील संकल्पना स्पष्ट करताना कशाप्रकारे यात काम करावे लागेल याची माहिती त्यांनी दिली..




















