सोलापूर : महासंचालक बार्टी व समाजकल्याण पुणे यांचे सुचनेनुसार बुधवार 28 सप्टेंबर 2022रोजी गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालय माळशिरस येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर यांचे वतीने जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर करण्याबाबत व जात वैधता प्रमाणपत्राबाबत येणा-या अडचणी याबाबत शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयाचे प्राचार्य कांबळे, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपायुक्त तथा सदस्य श्रीमती छाया गाडेकर, संशोधन सहाय्यक अधिकरी संतोष सर , बार्टी कार्यलय प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, माळशिरस समता दूत किरण वाघमारे , महाविदयालयाचे काटकर, वाघमोडे, ऐवले आदी प्राध्यापक वर्ग 11 वी 12 विज्ञान शाखेतील विदयार्थी वर्ग कार्यक्रमास मोठया प्रमाणपत्र उपस्थित होते.
जात वैधता प्रमाणपत्राबाबत पडताळणी बाबतचे मुख्य मार्गदर्शन छाया गाडेकर यांनी जात पडताळणी सदंर्भात येणा-या अडचणी विदयार्थीं यांना प्रस्तावासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडावे, वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे जेणेकरुन विदयार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. विदयार्थीं यांना शासनाचा शिष्यवत्ती व अनेक स्पार्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन, शासनाच्या ग्रामीण भागातील विदयार्थी यांच्या साठी योजनाची सविस्तर माहिती सांगितली.
महाविदयालचे प्राचार्य यांनी विदयार्थ्यी यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत व अचुक दाखल करण्यास सुचना दिल्या.




















