सोलापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या तज्ज्ञ संचालक पदी दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांची नुकतीच निवड झाली आहे. या प्रित्यर्थ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जनवात्सल्य निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी गटनेते चेतन नरोटे, वरीष्ठ उपाध्यक्ष भीमाशंकर जमादार, एम डी कमळे, रजाक बागवान यांची उपस्थिती होती.
यावेळी शिंदे यांनी हसापुरे यांचे अभिनंदन करताना जिल्हा दूध संघात चांगले काम करा दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे वळवा अशा सूचना केल्या.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी ही हसापुरे यांची दूध संघ संचालक व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदावर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
आमदार प्रणिती ताईंच्या सहकार्यानी आपणास प्रदेश काँग्रेस कमिटीवर काम करण्याची संधी मिळालेली आहे त्याबद्दल हसापुरे यांनी आभार मानले.



















