सोलापूर : वळसंग इथ ल्या श्री स्वामी समर्थ सहकारी सूत मिलची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्यासमोर काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी चांगलेच आव्हान उभा केले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थानी शिवदारे व हसापुरे या नेत्यांमध्ये म्हेत्रे यांनी समन्वय घडवून आणला आणि त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान हसापुरे यांनी माहिती देताना सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शब्दाचा मान राखत आणि सुत मिलच्या कामगारांच्या रोजीरोटीच्या विचार करत ही निवडणूक बिनविरोध केल्याचे सांगितले….

















