सोलापूर;: झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी हे पुन्हा पायाभूत प्रशिक्षणासाठी मसुरीला जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नात पदभार कुणाकडे जाणार? याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.
महाराष्ट्र शासनाचे सहसचिव सु.मो. महाडिक यांनी 3 फेब्रुवारी रोजी भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नतीने व निवडीने नियुक्त झालेल्या 19 अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या 124 व्या पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी आदेश जारी केले आहेत. मसूरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी येथे 13 फेब्रुवारी ते 24 मार्च या काळात हे प्रशिक्षण होणार आहे. यासाठी झेडपीचे सीईओ स्वामी यांच्यासह 19 अधिकाऱ्यांना 10 फेब्रुवारी रोजी कार्यमुक्त होऊन प्रशिक्षणासाठी हजर होण्यास सूचित केले आहे.
गेल्याच महिन्यात सीईओ स्वामी प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले होते. आता पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने पायाभूत प्रशिक्षणासाठी त्यांची निवड केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात पदभार प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे की अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांच्याकडे जाणार याबाबत चर्चा रंगली आहे.


















