सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळातील पहिले बजेट प्रशासक तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांना मांडण्याची संधी मिळाली आहे. दरवर्षी सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडाचा अर्थसंकल्प अंदाजे 40 ते 42 कोटींचा असतो. यंदाही किमान 42 कोटीचे बजेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमदार सुभाष देशमुखांनी वाढदिनी स्वीकारल्या अशा शुभेच्छा ; बापूंनी वाढदिवशी केले हे दोन नवे संकल्प
जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय सभा सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. कोहिणकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी असतील. मागील अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेचा अर्थ विभाग या बजेटची तयारी करीत होता. कोहिनकर यांनी तर पत्रकारांकडूनही काही चांगल्या योजना मागून घेतल्या आहेत. कृषी, समाज कल्याण, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य बांधकाम या विभागावर फोकस केला जातो. त्यात ‘थेट लाभार्थी’ मध्ये कोणत्या योजना असणार याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष आहे.
कृषी विभागासाठी कोणत्या नव्या योजना असतील?, समाज कल्याणला काय असेल?, ग्रामीण मुली आणि महिलांसाठी काय असणार? याची सर्व उत्तरे सोमवारी दुपारी दोन नंतर मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य असतात तेव्हा आपणास जास्त निधी मिळावा म्हणून त्यांचा पुढाकार असतो. प्रशासकाने यंदा कोणत्या विभागाला किती महत्व दिलंय हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणारं आहे. त्यामुळे सीईओ कोहिणकरांच्या पेटाऱ्यातून काय काय बाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















