सोलापूर – शासनाच्या विविध योजना सह लोकसहभागातून राबवून कोविड काळात योगदान देणाऱ्या सिध्देवाडी च्या सरपंच रोहिणी सारंग जाधव यांना दै. नवभारत, दै. नवराष्ट्र,मुंबई यांच्या वतीने आदर्श सरपंच पूरस्कार जाहीर झाला असून शनिवार 23 जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदीरात मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा होणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील उपेक्षित समजल्या जाणाऱ्या सिध्देवाडी गावात सरपंचपदाच्या एक वर्षाच्या कालावधीत शासनाच्या विविध योजना राबवल्या. गावात सर्व ग्रामस्थांना शुध्द पिण्याचा पाण्या बरोबर बचतगटांना एकत्रीत करून महिला सक्षमीकरण करणे साठी महत्वपुर्ण योगदान दिले आहे.
स्वत बीएड असल्यामुळे कोरोना काळात शाळे पासून वंचित असणारे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे साठी त्यांनी झाडाखाली मुलांना शिक्षण दिले.
कोविड काळात सर्वाना काळजी घेणेबाबत मन परिवर्तन केले. सर्व महिला, लहान मुले व वृध्द व्यक्ती यांना शासकीय कर्मचारी यांना विष्वासात घेऊन काम केले मुळे चांगल्या पध्दतीने नियोजन केले. सर्वात कमी मृत्पदर सिध्देवाडीत आहे.
तरटगाव, चिचुंबे व तरटगाव तीन गावात विस्तारलेल्सा ग्रामपंचायत भौगोलिक दृष्ट्या मोठी ग्रामपंचायत आहे. कोविड काळात चांगले काम केलेमुळे नवराष्ट्र ने त्यांची दखल घेतली आहे. अनेक लोक कोविड लस घेणेस इच्छूक नव्हते त्यांचे मन परिवर्तन केले तर गावास लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले. रस्ते व इतर पायाभुत सुविघा देणे साठी त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
पती सारंग जाधव यांचे सामाजिक योगदानामुळे विविघ विकास कामांनी चांगली गती घेतली आहे. सिध्देवाडी चा चेहरा मोहरा बदलणे साठी गावातील माजी सैनिक बाबुराव गोडसे, ग्रामपंचायत सदस्य- रमेश बनसोडे, बेबीनंदा बाबुराव गोडसे, सिद्धेश्वर जाधव, आशा जाधव, स्वाती जाधव, रणजीत जाधव, उपसरपंच लक्ष्मण गोडसे, यशवंत गडदे, पवित्रा जाधव, सुरेश गोडसे, आरोग्य सेविका – k.m लोहार, के एन शिवशरण अशा वर्कर वनिता बनसोडे, अनिता शिखरे, प्रणाली जाधव, राणी माने, अंगणवाडी सेविका-आरती ननवरे मॅडम, प्रभावती जाधव मॅडम, कुलकर्णी मॅडम, नवले आक्का, सुजाता नवले मॅडम यांनी प्रयत्न केले कोरोनाच्या काळात सर्वात जास्त सहकारी लाभलेले डॉ. ज्ञानेश्वर दत्तात्रेय मोरे यांनी सहकार्य केले आहे.





















