दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंजारा समाजाचे नेते संदीप राठोड यांची शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाली. शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुकाप्रमुख पद्दी निवड झाल्यानंतर संदीप राठोड यांनी गाव तेथे शाखा काढून पक्ष वाढिसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, युवासेना संपर्क प्रमुख सागर पाटील, उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले, मोहोळ तालुकाप्रमुख आबासाहेब भोसले , युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, अंकुश भाऊ राठोड उपशहरप्रमुख, सागर सोलापूरे जिल्हा उपप्रमुख, राजपूत सर, व्होनमाने सर, सुरेश पवार सर, बाळू पवार, सागर खांडेकर, किरण राठोड, संदिप पाटील, संदीप राठोड, बालाजी राठोड, शिवाजी राठोड, गोविंद निकम, गणेश निकम, शंकर राठोड, काशिनाथ पवार, शिवाजी पवार, शिवाजी राठोड नाईक, अनिल राठोड यांच्यासह इतर उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप राठोड युवा मंच यांनी परिश्रम घेतले .


















