सोलापूर : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी होते, सखल भागात चिखल होतो, दलदल झाल्याने नागरिकांना येण्याजाण्यास अडचण होत आहे. सोलापूर जिल्हा परिषद कडून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जाण्यासाठी झेडपीकडून महात्मा फुले प्रवेशद्वार आहे मात्र प्रवेशद्वारातून बाहेर पडताच वाटेत पावसाचे पाणी साचलेले असते, चिखल तर कायम असतो.
डाव्या बाजूला दुचाकी वाहने लावण्यासाठी मोठी मोकळी जागा आहे परंतु त्या भागात पावसाने पाणी साचून तळ्याचे स्वरूप आलेले असते त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात येणाऱ्या नागरिकांना पाण्यामुळे गाडी लावता येत नाही. आणि त्यांना जागा मिळेल तिथे वाहन लावून आपल्या जावे लागते. याचाच फायदा ट्राफिक पोलिसांची गाडी घेते वाहने उचलून नेते आणि तब्बल 500 रुपये दंड त्या नागरिकाला होतो. यामुळे नागरिक प्रचंड वैतागले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी सामान्य नागरिक जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे करीत आहेत.




















