सोलापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. आज, रविवारी सकाळी सव्वा सात वाजता ते सोलापुरात आले होते.
त्यावेळी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या सोबत प्रदेश सचिव संतोष पवार उपस्थित होते. त्यानंतर ते उस्मानाबाद दौऱ्यावर रवाना झाले.


















