सोलापूर (प्रतिनिधी) : मागील दोन वर्षापासून जगावर असलेले कोरोनाचे विघ्न दूर करत यावर्षी गणरायाचे आगमन होत असून उत्सवावरील सर्व निर्बंध दूर हटवल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जल्लोशात साजरा होत असल्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सांगीतले..
मा.पृथ्वीराज माने युवा मंच सोलापूर व कुमठे येथील ब्रह्मदीप सामाजिक संस्था,व मजरेवाडी येथील नितिन भोपळे मित्र मंडळाचे वतीने कुमठे व मजरेवाडी येथे आयोजित केलेल्या घरगुती गणेशमुर्ती वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी आमदार दिलीपराव माने, सतीश माने,जयकुमार माने, डॉ. पृथ्वीराज माने,अजित माने,यांच्या हस्ते श्री मुर्तीचे वाटप करण्यात आले.
संपूर्ण जगावर मागील दोन वर्ष कोरोनाचे जिवघेणे संकट होते. मात्र हे संकट दूर करण्यासाठी डाँक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस,आदिनी स्वताचा जिव धोक्यात घालून मोठे योगदान दिले. विघ्नहर्ता गणेशाची ही कृपाच म्हणावी लागेल यावर्षी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस देखील झाला असून शासनाने उत्सवावरील सर्व निर्बंध हटवल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याची तयारी सर्वत्र चालू असल्याचे माने यांनी सांगीतले तर युवा मंचचे माध्यमातून राबवलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी शावरु वाघमारे, राजू ताकमोगे,तानाजी सिनगारे,दादाराव ताकमोगे, विश्वनाथ शेवगार, बाबूराव पवार, कलमेश्वर निळ, दत्ता घोडके, आण्णा व्होरडे,धनाजी सुरवसे, जावेद देवणी, धर्मा हत्तुरे, कृष्णात घोडके, प्रदीप माने, एकनाथ माने, प्रदीप माने,गजेंद्र निकम,समीर शेख आदीसह महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.




















